करवीर तालुक्यातील पाचगांव हे कोल्हापूर श्ाहरालगत ५ कि.मी. अंतरावर आहे. पाचगांव मध्ये पूर्वी पांडवांणी वास्तव्य केले होते तसेच त्यांनी पांचालेश्वर महादेव मंदीराची उभारणी केली त्या पांचालेश्वर नावावरूण्ाच पाचगांव हे नाव आले आणि याच नावाने ओळख्ाले जाते. पाचगांव गावाने २००२/२००३ मध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानमध्ये द्वितीय तर २००३/२००४ मध्ये प्रथ्ाम कमांक मिळवला आहे.
तसेच सन २००४/२००५ मध्ये यश्ावंत सरपंच पुरस्कार व आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार मिळवला आहे. गावाचे जागरुक देवस्थान भैरवनाथ्ा देवालय असून मंदीर अतिश्ाय सुंदर आहे. तसेच देवाची मुर्ती अप्रतिम आहे. गावामध्ये भैरवनाथ जन्म अष्टमी सोहळा होतो. त्यामध्ये अख्ांड ज्ञानेश्वर हरिनाम सप्ताह असे धार्मिक सोहळा ठेवला जातो. तेथे सात दिवस ज्ञानेश्वरी वाचन केले जाते. तेथे सर्व जाती-जमातीचे लोक एकत्र येतात. त्याचप्रमाणे गावामध्ये इतर देवालये आहेत.
त्यापैकी ख्ाडीचा गण्ापती पंचक्राशीमध्ये प्रसिध्द आहे. त्याचबरोबर महादेव मंदीर, हनुमान मंदीर, ईरदेव मंदीर, पाठोबा मंदीर, कोलाटा मंदीर, दत्त मंदीर व एक मशिद आहे. गावामध्ये सर्व तरुण्ा मंडळे व महिला मंडळा मार्फ़त गणेश्ा उत्सव, नवरात्र उत्सव, शिवजंयती, दत्त जयंती, हनुमान जयंती, महाशिवरात्र उत्सव, स्वामी समर्थ जयंती इत्यादी उत्सव साजरे केले जातात.
त्याच प्रमाणे पारंपारिक कलेचे गुण्ा जोपासले जातात. याच बरोबर रांगोळी स्पर्धा, स्वच्छ घर स्पर्धा, झिम्मा फ़ुगडी स्पर्धा, उखाणे पारंपारीक गाणे स्पर्धा, सुंदर जनावर स्पर्धा, मॅराथॉन स्पर्धा, बैलगाडी व म्हैस पळवणे स्पर्धा, सजिव देखावे स्पर्धा, सोंगी भ्ाजन स्पर्धा, लेक वाचवा अभियान यासारखे मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात.